Bhosari Fire News : भोसरीत केमिकल कंपनीला लागलेली आग आटोक्यात

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसीतील गवळीमाथा येथील एका केमिकल कंपनीत आज (शनिवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास मोठी आग लागली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एमआयडीसी, टाटा आणि पीएमआरडीए येथील एकूण 14 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे पिंपरी अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. कंपनीत मोठा केमिकल साठा होता. मात्र, आग वेळेत आटोक्यात आल्यामुळे मोठी हानी टळली. सुमारे तीन तास ही आग धुमसत होती. त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आग लागलेल्या या कंपनीच्या आजूबाजूला इतर मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे आग वेळेत आटोक्यात येणं गरजेचं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III