Pimpri : वल्लभनगर येथे गुरांच्या गोठ्याला आग; नऊ जनावरे जखमी

एमपीसी न्यूज – जनावरांच्या गोठ्याला आग लागून (Pimpri) नऊ जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना वल्लभनगर, पिंपरी येथे बुधवारी (दि. 7) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.

वल्लभनगर येथे गंगा स्काय सोसायटी समोर गुरांचा गोठा आहे. या गोठ्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये गोठ्यात बांधलेली नऊ जनावरे भाजून गंभीर जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.

Bjp : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या घर चलो अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. जनावरांना वैद्यकीय मदत (Pimpri) पुरवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.