Ravet : नव्या टेम्पोला विसरली चावी अन् घात झाला; घराला टेम्पो धडकून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रात्री घरासमोर टेम्पो पार्क करताना चावी (Ravet )टेम्पोला विसरून राहिली. पहाटेच्या वेळी एका अल्पवयीन मुलाने टेम्पोची चावी सुरू करतात टेम्पोची घराला धडक बसली. या धडकेत घराचा पत्रा अंगावर पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

ही घटना 13 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे सहा वाजता शिंदे (Ravet )वस्ती रावेत येथे घडली. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याचा तपास केल्यानंतर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : विकसित भारत संकल्प यात्रेस प्रतिसाद; 39 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला लाभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या भावाने भंगार जमा करण्यासाठी छोटा टेम्पो घेतला होता. टेम्पो घेऊन अवघे दहा दिवस झाले होते. 12 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी टेम्पोला टप बनवला आणि रात्री उशिरा घरासमोर पार्क केला. अल्पवयीन मुलाचा भाऊ टेम्पोची चावी काढण्यास विसरला. त्यामुळे चावी तशीच राहिली. 13 ऑगस्ट रोजी सकाळी अल्पवयीन मुलगा उठला आणि तो टेम्पोमध्ये बसला. त्याने चावी फिरवून टेम्पो सुरू करण्याचा प्रयत्न केला. टेम्पो सुरू होतात तो पुढे पत्र्याच्या घरावर धडकला. घरामध्ये अल्पवयीन मुलाची पुतणी झोपलेली होती. पत्रा मुलीच्या अंगावर पडला आणि त्यात ती चिरडली गेली.

जखमी तीन वर्षीय मुलीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सुरुवातीला याप्रकरणी मुलीच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याचा तपास केल्यानंतर मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्या अल्पवयीन चुलत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.