Bhosari : मारहाण, विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणाची वाट अडवून त्याला मारहाण केली. तसेच त्याच्या भावाला आणि भावाच्या पत्नीला मारहाण करून तिचा विनयभंग केला. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 6) सायंकाळी सातच्या सुमारास कुंभारवाडा भोसरी येथे घडली.

याप्रकरणी निलेश कैलास जाधव (वय 30, रा. कुंभारवाडा, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय संजय अगरवाल (वय 25, कुंभारवाडा, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने फिर्यादी निलेश यांचा रस्ता अडवला. फिर्यादी यांच्या घरासमोर मोटारसायकल आडवी लावून मोटारसायकल पार्क करण्याच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ आणि भावाची पत्नी आले.

आरोपीने त्यांनाही अश्लील शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या भावाच्या पत्नीशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.