Talegaon : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची 43 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सदनिकांची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे बँकेकडून सुमारे 43 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाचे हप्ते न भरता बँकेची फसवणूक केली. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया तळेगाव शाखेचे शाखाधिकारी संतोष बागवे (वय 45) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पांडुरंग पाटील (रा. बिजलीनगर, चिंचवड), राहुल प्रताप दीक्षित (रा. चिंचवड), अॅड. डी. एस. तायडे (रा. बाणेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे तळेगाव दाभाडे कुटे नंदनवन येथे दोन फ्लॅट होते. ते त्यांनी 2011 साली विकले. त्यानंतर विकलेल्या फ्लॅटचे दुय्यम निबंधक कार्यालयात 2013 साली बनावट खरेदी खत नोंदवले. ते खरेदीखत युनियन बँकेच्या तळेगाव शाखेत देऊन त्याआधारे स्वतःच्या नावावर 43 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले.

कर्जाचे हप्त न भरता बँकेची आणि बनावट दस्त तयार करून शासनाची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.