Wakad : माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी पैसे न आणल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत, या कारणावरून विवाहितेचा छळ केला. ही घटना मिरज येथे 3 डिसेंबर 2007 ते जानेवारी 2018 या कालावधीत घडली.

याप्रकरणी 34 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती भरत बाजीराव पवार (वय 36, रा. मिरज, सांगली), सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी विवाहितेकडे माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यास विवाहितेने नकार दिल्याने किरकोळ कारणांवरून आरोपींनी तिचा छळ केला. फिर्यादीला वेळोवेळी क्रूरतेची वागणूक देत मानसिक आणि शारीरिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.