Bhosari : प्रा. मिलिंद जोशी यांना यंदाचा नारायण सुर्वे जीवनसाधना पुरस्कार जाहीर

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा गौरव सोहळा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा दहाव्या स्मृतिदिनानिमित्त काव्यजागर आणि गौरव सोहळा आयोजित केला आहे. नारायण सुर्वे जीवनसाधना पुरस्कार यंदा प्रा. मिलिंद जोशी यांना जाहीर झाला आहे. हा सोहळा भोसरी येथील आदर्श विद्यालय येथे शुक्रवारी (दि. 16 ऑगस्ट) होणार आहे.

भोसरी येथे होणा-या या काव्यजागर गौरव सोहळ्याचे उदघाटन अ.भा.म.सा. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे असणार आहे.

  • यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह उध्दव कानडे, नगरसेविका प्रियंका बारसे, म.सा.प. भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष मुकुंद आवटे, सुर्वे मास्तरांची कन्या कल्पना सुर्वे आदी उपस्थित असणरा आहे.

या गौरव सोहळ्यात नारायण सुर्वे जीवनसाधना पुरस्कार प्रा. मिलींद जोशी, नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार कवी माधव पवार, नारायण सुर्वे श्रमभूषण पुरस्कार कवी राजेंद्र वाघ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच पाट्य पुस्तकात कविता असलेले नारायण सुर्वे यांचे वारसदार कवींचा काव्यजागर कार्यक्रमात कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला हा कार्यक्रम होणार आहे. यात तुकाराम धांडे, मृणालिनी कानिटकर, हनुमंत चांदगुडे, अस्मिता चांदणे यांचा सहभाग असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.