Bhosari Mohotsav : भोसरी महोत्सवात ज्येष्ठ कवीं बरोबर नवोदित सहभागी 

एमपीसी न्यूज : भोसरी कला, क्रीडा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भोसरी महोत्सव 2022’ मध्ये आयोजित केलेल्या काव्यामैफिलीचे शुक्रवारी (दि.2) कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे उद्घाटन ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.(Bhosari Mohotsav) कवितेला सन्मान मिळवून देण्यासाठी भोसरी कला क्रीडा मंचच्या वतीने सतरा वर्षे कवी संमेलन आयोजित करण्यात येते हे खूप गौरवास्पद आहे. अशा शब्दात कवी व अभिनेते किशोर कदम तथा सौमित्र यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.

आपल्या भवतालच्या परिस्थितीशी आणि निसर्गाशी एकरूप होऊन आनंदाचे क्षण वेचत वेचत जगता आले पाहिजे. वैयक्तिक पातळीवर तसेच समाजातील विविध घटकांबाबत घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण, पडसाद कवींच्या कलाकृतीत दिसतात. माझे बालपण समुद्र किनारी गेले. त्यामुळे “लाटा” कविता सुचली. एका नाटकाचा सेट उभारताना “लग्नं” ही रचना केली.(Bhosari Mohotsav) कविता कुठेही सुचू शकते अगदी स्मशानातही पण तिची प्रक्रिया मनात अनेक दिवसांपासून सुरू असते. उत्कृष्ठ कविता सुचण्यासाठी आणि सादरीकरणासाठी शब्दं संचयासह संवाद कौशल्य आणि चौकस दृष्टीकोन पाहिजे. अभिनय आणि कविता या माझ्या दोन सादरीकरणाच्या बाजू आहेत. असंही कवी व अभिनेते किशोर कदम म्हणाले.

MPC News Online Bappa Part 7 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 7)

यावेळी प्रमुख पाहुणे प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे कार्यक्रमाचे संयोजक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, विजय फुगे तसेच भाजपा शहर सरचिटणीस अमोल थोरात, माजी नगरसेवक राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, महादेव गव्हाणे, सुनंदा फुगे तसेच सामजिक कार्यकर्त्या रोहिणी भोंडवे,भरत लांडगे, नंदकुमार दाभाडे, भाऊसाहेब डोळस, निवृत्ती फुगे, संदीप राक्षे, विजय लांडगे,(Bhosari Mohotsav) किरण लांडगे, नंदू लोंढे आदींसह सहभागी कवी शोभा जोशी, सुरेखा कटारिया, कमल आठवले, सुरेश डोळस, विजय ओव्हाळ, विनायक विधाटे, दत्तात्रय इंगळे, रामदास हिंगे, संजय बेंडे, अमरदीप मखमले, कमल आठवले, दिव्या भोसले आदी कवी उपस्थित होते.

 

जेष्ठ कवी म. भा. चव्हाण यांनी ‘जिंदगी घनदाट आहे, नागमोडी वाट आहे, ती तशी आहे, तरी हा गडी बेफाट आहे.’ या कवितेबरोबर ‘मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो,(Bhosari Mohotsav) दुनियेचे लफडे चष्मा काढून बघतो’ या रचना सादर केल्या. स्वागत ॲड. नितीन लांडगे, प्रास्ताविक राजेंद्र सोनवणे, सूत्र संचालन प्रा. श्रीकांत चौगुले आणि प्रा. दिगंबर ढोकले, आभार विजय फुगे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.