Bhosari : महिलेचा विनयभंग करून अॅसिड टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज – महिला अॅसिड टाकण्याची धमकी देत तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. हा प्रकार 21 फेब्रुवारी रोजी भोसरी एमआयडीसी परिसरात घडला. याबाबत 24 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकित वणवे / पाटील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 21 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता पीडित महिलेच्या घरी आला. त्याने फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने आरडाओरडा केला असता आरोपीने त्यांचा हात पिरगाळून शिवीगाळ करत ‘तुला व तुझ्या नव-याला जिवंत सोडणार नाही. तुझ्या अंगावर अॅसिड टाकून तुझा चेहरा खराब करेल. पोलीस तक्रार केली तर तुला बघून घेईल’ अशी धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.