Wakad : सायकल चोरी करताना अडविल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमधील सायकल चोरी करताना अडविल्याने तिघांनी तरुणाला स्पॅनरने (लोखंडी पान्हा) मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 24) पहाटे साडेतीन वाजता पुनावळे येथील तलाठी कार्यालयाजवळ शोभा रेसिडेन्सी जवळ घडली.

सुमित प्रदीप टकले (वय 26, र.या पुनावळे, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कृष्णा गुलाबराव पोले, अक्षय रुस्तम राठोड (दोघे रा. मोरेवस्ती, चिखली) आणि त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमवारी पहाटे फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये चोरीच्या उद्देशाने आले. तिघेजण पार्किंगमधील सायकल चोरून नेत असताना फिर्यादी यांनी त्यांना अडवले असता आरोपींनी त्यांच्याकडील लोखंडी पान्याने मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.