Bhosari : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी (Bhosari)  भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना डिसेंबर 2022 आणि 3 जून 2023 रोजी धावडेवस्ती, भोसरी येथे घडली.

सुभाष शिंदे (वय 44, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : लहान मुलांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जुंपली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई आणि वडिलांचे आपसात जमत नसल्याने फिर्यादी आणि त्यांची आई या दोघी आरोपीच्या घरी राहत होत्या. डिसेंबर 2022 मध्ये आरोपीने रात्रीच्या वेळी फिर्यादी आणि तिची आई घरात झोपलेल्या असताना फिर्यादिसोबत गैरवर्तन करत विनयभंग केला.

त्यानंतर 3 जून रोजी फिर्यादी मुलगी, त्यांची आत्या आणि मावशी सोबत आईला समजावून घरी घेऊन जाण्यासाठी आल्या असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत (Bhosari) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.