Bhosari News : फ्लेक्स लावण्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – फ्लेक्स लावण्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला हाताने व कोयत्याने मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 6) मध्यरात्री पावणे एक वाजता बालाजीनगर चौक, टेल्को रोड, भोसरी येथे घडला.

सागर संजय चौगुले (वय 21, रा. बालाजीनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवन कांबळे, तेजस ननावरे, सद्दाम शेख, नागेश चव्हाण (सर्व रा. बालाजीनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर येथे फ्लेक्स लावण्याच्या कारणावरून फिर्यादी चौगुले आणि आरोपींचे भांडण झाले. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी नागेश चव्हाण याने कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.