Bhosari News: भोसरीत साडेचार लाखांची घरफोडी; तरुणीला अटक

फिर्यादी सांगळे यांचे घर एक ते 9 सप्टेंबर या कालावधीत बंद होते. त्या दरम्यान आरोपी सोनाली हिने घरात प्रवेश करून घरातून चार लाख 63 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

एमपीसी न्यूज – भोसरी मधील शास्त्री चौकातील एका सोसायटीमध्ये घरफोडी करून एका तरुणीने चार लाख 63 हजारांचे 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना एक सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2020 या कालावधीत शिरसाट यांची बिल्डींग, शास्त्रीचौक, भोसरी येथे घडली.

सोनाली श्रीकृष्ण मुंढे (वय 22, रा. शास्त्रीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रेखा गणेश सांगळे (वय 27, रा. शास्त्रीचौक, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सांगळे यांचे घर एक ते 9 सप्टेंबर या कालावधीत बंद होते. त्या दरम्यान आरोपी सोनाली हिने घरात प्रवेश करून घरातून चार लाख 63 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी सोनाली हिला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.