Bhosari News: गवळीमाथा येथील अनधिकृत टपऱ्यांसह पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने प्रभाग क्रमांक 8 मधील गवळीमाथा येथील अनुकुल चौक या रस्त्यावरील 14 अनधिकृत टप-या व पत्राशेड निष्कासित करण्यात आली आहेत.

शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करण्याच्या सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी व अतिक्रमण पथकाच्या झालेल्या बैठकीत दिल्या होत्या.

त्यानुसार क क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नैतृत्वाखाली प्रशासन अधिकारी नाना मोरे व भोसरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रदिप पाटील, पोलिस निरिक्षक जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक घिघे, रत्नपारखी यांच्या पथकाने ही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई केली.

या पथकामध्ये क क्षेत्रिय कार्यालय व इ क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण पथकाचे अतिक्रमण निरिक्षक बाळासाहेब कार्ले, अतिक्रमण निरिक्षक काळे एल.एम. व बीट निरिक्षक शिरसाट एस.डी यांच्यासह 10 अतिक्रमण मजूर,20 पोलिस कर्मचारी, 15 होमगार्ड व 2 जेसीबी , इतर यंत्रसामुग्रीच्या मदतीने ही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.