Bhosari News : ओम हॉस्पिटलतर्फे मोफत अ‍ॅन्जिओप्लास्टी : डॉ. सुनील अग्रवाल

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे सर्वत्रच अर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे आज कुठलाही आजार न परवडणारा आहे. अशा परिस्थितीत भोसरी येथील ओम हॉस्लिटलच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत फक्त पाच हजारात अ‍ॅन्जिओग्राफी आणि आवश्ययक असल्यास अ‍ॅन्जिओप्लास्टी मोफत केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. सुनील अग्रवाल यांनी दिली आहे.

आरोग्य तपासणी उपक्रमाअंतर्गत हृदयासोबत, ब्लडशुगर, युरीन, हिमोग्राम, ईसीजी, 2डीको व इतर चाचण्या करण्याची विशेष सोय ओम हॉस्पिटल येथे नाममात्र शुल्कात उपलब्ध करण्यात आली आहे.

डॉ. सुनील अग्रवाल म्हणाले, अनेक वेळा रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होते. कोरोनाबाधित रूग्णांमध्ये असामान्य हृदयगती, हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे आणि थकवा येणे यासारखे लक्षणे वारंवार दिसतात. अनेक वर्षापासुन हृदयाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती खुपच कमी झालेली असते.

यामुळे स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. कोरोनामुळे सर्वांंचे मानसिक तणाव वाढल्याने याचा परिणाम संपूर्ण शरीरावर पडत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.