Bhosari News : व्हॉटसॲपवर केला लग्नाचा वादा, विमान खर्च व सोने करासाठी पैसे मागून महिलेची 22 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्हॉटसॲपवर मेसेज आणि व्हिडीओ कॉलकरून लग्नाचा वादा केला. विमान तिकीटासाठी व सोन्यावरील कर भरण्यासाठी पैसे मागून महिलेची 22 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जून 2021 ते 17 फेब्रुवारी 2022 या कालावधीत बो-हाडेवाडी, मोशी येथे ही घटना घडली.

महिला फिर्यादीने गुरूवारी (दि.17) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. बायका बनको या इसमाविरोधात भारतीय दंड विधान कलम 419, 420, माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी) (डी) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इसमाने फिर्यादी महिलेला व्हॉटसॲपवरून संपर्क केला. वारंवार व्हॉटसॲपवर मेसेज आणि व्हिडीओ कॉलकरून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून, लग्नाचा वादा केला.

इसमाने फिर्यादी यांच्याकडे विमान तिकीट आणि सोन्यावरील कर भरण्यासाठी बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेतले व महिलेची 22 लाख 24 हजार रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.