Bhosari News: ट्रकमधील 112 तेलाच्या डब्यांची परस्पर विक्री; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

शिंदे यांना खोपोली मधील तेलाच्या कंपनीमधून तेलाचे डबे वाहतूक करण्याची ऑर्डर मिळाली.

एमपीसी न्यूज – कंपनीतून तेलाचे भरलेले डबे घेऊन निघालेल्या ट्रक चालकाने 112 डबे मालकाच्या परस्पर विकून त्याचा अपहार केला. याबाबत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ते 17 जुलै दरम्यान भोसरी परिसरात घडला.

मनोजकुमार काकासाहेब शिंदे (वय 34, रा. भेकराईनगर, हडपसर) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक सुरेश प्रकाश राजोळे (वय 25, रा. लक्ष्मीनगर, दिघी. मूळ रा. पिरुपटेल वाडी, ता. निलंगा, जि. लातूर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे आणि आरोपी राजोळे हे दोघेही चालक आहेत. शिंदे यांना खोपोली मधील तेलाच्या कंपनीमधून तेलाचे डबे वाहतूक करण्याची ऑर्डर मिळाली.

खोपोली येथील फ्रिगोरिफीको अलाना प्रा. लि या कंपनीमधून 20 टन वजनाचे तेलाचे डबे शिंदे यांनी आरोपी राजोळे याच्या ट्रकमध्ये भरून दिले. भोसरी परिसरात आरोपीने एक लाख 68 हजार रुपये किमतीचे 1 हजार 680 किलो वजनाचे 112 तेलाचे डबे परस्पर चोरी करून विकले. याबाबत 5 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.