Chinchwad News: भोसरी, दिघी, हिंजवडीमधून तीन दुचाकी चोरीला

तिन्ही गुन्ह्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुचाकी वाहने चोरून नेली आहेत.

एमपीसी न्यूज – भोसरी, दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 5) वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिन्ही गुन्ह्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुचाकी वाहने चोरून नेली आहेत.

पहिल्या घटनेत जय जगन्नाथ राऊत (वय 24, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादी राऊत यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची केटीएम आरसी 390 ही दुचाकी (एमएच 12 एलयू 6263) 1 सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्याची दुचाकी चोरून नेली. 2 सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत सलीम चांद इनामदार (वय 30, रा. भारतमाता नगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी इनामदार यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी (एमएच 14 बीई 1610) 16 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या घराजवळ पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. 17 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या घटनेत महेश झब्बू लोंढे (वय 35, रा. लोंढेचाळ, दापोडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी लोंढे यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची बुलेट (एमएच 14 एफझेड 2834) बाणेर येथील ऑडी शोरूम ज्युबलीयंट स्पोर्टकार ऑफिससमोर 4 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता पार्क केली होती.

दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी ऑफिस समोरून लोंढे यांची बुलेट चोरून नेली. हा प्रकार त्याच दिवशी रात्री साडेसात वाजता उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.