Bhosari News: लग्नात चांगला मानपान न दिल्यावरून विवाहितेचा छळ

फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी फिर्यादी यांच्या लग्नात चांगला मानपान दिला नाही. तसेच फिर्यादी यांना दोन्ही मुलीच कशा झाल्या यावरून त्यांच्याकडे घटस्फोटाची मागणी केली.

एमपीसी न्यूज – लग्नात चांगला मानपान दिला नाही, या कारणावरून तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, पती, सासू आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती इम्रान बशीर शेख (वय 27, रा. पवार वस्ती, दापोडी), सासरा बशीर शेख (वय 55), नूरजहा बशीर शेख (वय 48, दोघे रा. बोपोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी फिर्यादी यांच्या लग्नात चांगला मानपान दिला नाही. तसेच फिर्यादी यांना दोन्ही मुलीच कशा झाल्या यावरून त्यांच्याकडे घटस्फोटाची मागणी केली.

फिर्यादी यांनी घटस्फोटासाठी नकार दिला असता आरोपींनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच माहेरहून पैसे आणावेत अशी मागणी केली. विवाहितेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करून त्यांना क्रूर वागणूक देत त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.