Bhosari News: दुचाकीला लागलेली आग पसरल्याने स्टोअर रूममधील साहित्य जळाले

दुचाकीची आग शेजारी असलेल्या स्टोअर रूममध्ये पसरली. स्टोअर रूममधील फायबर फर्निचर, टीव्ही, लाईट इन्व्हर्टर, दारे खिडक्या असे साहित्य जळाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

एमपीसी न्यूज – कार्यालयासमोर लावलेली दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिली. दुचाकीची आग शेजारी असलेल्या स्टोअर रूममध्ये पसरली. त्यामध्ये स्टोअर रूममधील साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी (दि. 5) पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास इंद्रायणी नगर, भोसरी येथे घडली.

सुमन भिवाजी सहाणे (वय 58, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा तुषार सहाणे यांच्या कार्यालयाच्या बाहेर पार्क केलेली विलास पांडुरंग चौरे यांची दुचाकी (एमएच 14 एवाय 9967) अज्ञात इसमाने पेटवून दिली.

दुचाकीची आग शेजारी असलेल्या स्टोअर रूममध्ये पसरली. स्टोअर रूममधील फायबर फर्निचर, टीव्ही, लाईट इन्व्हर्टर, दारे खिडक्या असे साहित्य जळाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.