Bhosari News: गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर भोसरीतून दावडी व कडूससाठी पीएमपीएमएलच्या बससेवेस प्रारंभ

एमपीसी न्यूज – गुढीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर भोसरी बीआरटी बस स्थानकातून खेड तालुक्यातील कडूस आणि दावडी या ग्रामीण भागात दोन नवीन बसमार्ग सुरु करण्यात आले आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत रोजगारासाठी येणा-या नागरिक व विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. तसेच या ग्रामीण भागातील रोजगारात आणि नागरिकांच्या अर्थाजनातही पीएमपीएमएलच्या नवीन मार्गांमुळे वाढ होईल असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

गुढीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर भोसरीतील बीआरटी बस स्थानकातून भोसरी ते दावडी (मार्ग क्र. 370) आणि भोसरी ते कडूस (मार्ग क्र. 371) या दोन नवीन मार्गांचे आमदार लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, कामगार नेते सचिन लांडगे, पांडूरंग गवळी,  योगेश लांडगे, योगेश लोंढे, वाहतूक व्यवस्थापक राजेश रुपनवर तसेच पीएमपीएमएलचे सुनील दिवाण, दत्तात्रय झेंडे, सतिश गव्हाणे, संतोष किरवे, शांताराम वाघेरे, काळूराम लांडगे, कुंदन काळे, गणेश गवळी व भोसरी ग्रामस्थ आणि प्रवाशी उपस्थित होते.

बस मार्ग क्र. 370 भोसरी ते दावडी गावचे अंतर 40.50 कि.मी. आहे. कुरुळी फाटा, चाकण मार्केट यार्ड, वाकी खुर्द, रोहकल फाटा, शिरोली, कडूस फाटा, राजगुरुनगर महाविद्यालय, होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव, दावडीगाव असा मार्ग असणार आहे. भोसरीतून दावडीसाठी पहिली बस सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी आणि शेवटची बस सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुटणार आहे. तर, दावडीतून पहिली बस सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी आणि शेवटची बस रात्री 8 वाजून 10  मिनिटांनी सुटणार आहे.

बस मार्ग क्र. 371 भोसरी ते कडूसचे अंतर 39.50  कि.मी. आहे. चाकण, शिरोली, टोल नाका, कडूस फाटा, म. गांधी विद्यालय खेड, अमूल डेअरी चांदोली रोड, वडगाव पाटोळे, दोंदे गाव, कडूस एसटी स्थानक, भैरवनाथ मंदीर, कडूस असा मार्ग असणार आहे. भोसरी येथून कडूससाठी पहिली बस सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी तर शेवटची बस दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे. कडूसहून पहिली बस सकाळी 7 वाजता तर शेवटची बस दुपारी 4 वाजून 30  मिनिटांनी सुटणार असल्याची माहिती  पीएमपीएमएल व्यवस्थापनाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.