Bhosari News – भोसरी एमआयडीसीमध्ये महावितरण कार्यालयाच्या बाहेर आंदोलन

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी येथील (Bhosari News) महावितरण कार्यालयाच्या बाहेर आज आंदोलन करण्यात झाले. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. मेटल फिनिशर्स असोसिएशन पुणे, रबर असोसिएशन, फेडरेशन असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना या औद्योगिक संघटना एकत्रित येऊन महावितरणच्या प्रस्तावित 37% वीज दरवाढीच्या निषेधार्थ भव्य आंदोलन घेण्यात आले.

या आंदोलनात उद्योजक आणि उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी मोर्चामध्ये ही विधाने दिली, “शासनाची कुठेतरी खाजगीकरणाकडे वाटचाल चालू आहे आणि त्याचा फटका उद्योजकांना बसत असून आज उद्योगांना मंदीमध्ये खर तर संधीची गरज आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस हे चाणक्य म्हणून ओळखले जातात. परंतु, त्यांनी आपला चाणक्यपणा उद्योजकांचे उद्योग वाचवण्यात दाखवल्यास उद्योजक त्यांचे आभार मानतील. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्य विजेचे दर हे गगनाला भिडले असून विजेची चोरीसुद्धा महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात आहे.

शासनाने वीज चोरी थांबून आपला तोटा भरून काढावा. त्यासाठी उद्योजकांना भेटीस धरून महाराष्ट्रातील उद्योजक दराला कंटाळून परराज्यात स्थलांतरित होण्याचा विचार करत आहे. याच प्रकारे जर शासनाचे धोरण राहिल्यास उद्योजकांना पुढील काळामध्ये आपले उद्योग बंद करून मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल ”

मेटल फिनिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजीव शहा यांनी महावितरणचा जाहीर निषेध करून उद्योजकांना जागतिक स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर पंतप्रधानांच्या बोलण्यानुसार जर ‘फास्ट इकॉनोमिक ग्रोथ’ करायचे असेल तर महाराष्ट्रामध्ये दर हा सर्वसामान्य उद्योजकांना परवडेल असाच पाहिजे असे सांगितले.

फेडरेशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गोविंद जी पानसरे यांनी शासनाचा (Bhosari News) पाठपुरावा करून महाराष्ट्रातील उद्योजक जगला तर पुन्हा एकदा राज्यामध्ये उद्योगांची भरभराट होऊन परराज्यातील उद्योग महाराष्ट्रात येण्यास प्रतिसाद देतील असे सांगितले. यावेळी पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटनेतर्फे अध्यक्ष दुर्गा भोर, उद्योजिका कांचन पंत, आणि इतर उद्योजकांनी सुद्धा आपले म्हणणे मांडले.

Pune : पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानिमित्त तब्बल 4440 ठिकाणी पार पडले रक्तदान शिबिर

यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुरेश भोसले साहेब यांना निवेदनाद्वारे सर्व उद्योजक अध्यक्ष अभय भोर, संजीव शहा, गोविंद पानसरे, विनीत मराठे, वैभव जगताप, विजय खळतकर, मिलिंद वराडकर, महिला लघुउद्योग संघटनेच्या दुर्गा भोर, कांचन पंत, जयश्री साळुंखे या उद्योजकांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी मुख्य अभियंता हे निवेदन नक्की शासन दरबारी पाठवून उद्योजकांचा विचार केला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.