Bhosari News : वीज बिलांच्या तक्रारीबाबत उद्योग सेनेचे महावितरणकडे निवेदन  

एमपीसी न्यूज – ग्राहकांकडे उशीरा पोहचणारी विजबिल व त्यामुळे नाहक ( Bhosari News ) विजपुरवठा खंडीत होत असल्याची तक्रार उद्योग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.23) महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

यासंदर्भात महावितरणच्या भोसरी पॉवर हाऊस चे मुख्य अभियंता उदय भोसले आणि पुण्याचे  सी एस ह्यांची भेट घेत त्यांमनी एक निवेदन देण्यात आले. यावेळी उद्योग सेनेचे अध्यक्ष कार्तिक गोवर्धन,उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर,मंगेश साठे,सह समन्वयक सचिन बोधणी,सचिव प्रसाद बोधे,सल्लागार निखिल येवले,सदस्य झा साहेब,पंकज कुलकर्णी,गणेश ढगे,नरेंद्र चिपळूणकर,अभिजीत पाटील उपस्थित होते.

 

Chakan News : चाकण एमआयडीसी परिसरात घरफोडी करणारे अटकेत, सव्वा चार लाखांचा ऐवज जप्त

 

निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्या पासुन असे आढळून आले आहे की विजेचे रिडिग महावितरण कडुन दर महा वेळेत घेतले जात आहे,परंतू  त्याचा तपशीलबिलाची छापई,आणि बिलाचे वितरण हे वेगवेगळ्या कंत्राटी करारावर दिले गेले आहेत,ह्या मुळे बिलाला ग्राहकाकडे येण्यास उशीर होतोय असे काही महिन्यापासून चाले आहे. ग्राहकांना विशेष करुन उद्योजकांना व कारखांनदाराना बिल सवलती तारखे नंतर मिळतातजेणे करुन जास्तीचा खर्च होतोय .काहीना विज बिल मिळत नाही.

मग महावितरण कडून विज कापण्यात येते किंवा कंत्राटवर/महावितरणाची मुलं/अधिकारी त्यांचा कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या वसुली साठी येतात हे त्यांच्या निदर्शनास आणुन दिले.अवाजवी बिल,मिटर काढून नेणे,रिडिंग तपशील नीट न दिल्यामुळे आलेला विज भरणा,तक्रार दिल्या नंतर सूद्धा त्या बद्दलची दखल न घेणे हे सगळ असुन विज दर वाढवण्याचा घाट घालण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रात याची अस्वस्थता आहे.

यावेळी महावितरण याची तत्परता दाखवेल, अशी ग्वाही महावितरणा कडून उद्योग सेनेला ( Bhosari News ) देण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.