Bhosari : भोसरी गावात मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय उपोषण

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणासाठी संपूर्ण (Bhosari) शासन व्यवस्थेसमोर खडे ठाकलेले मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून काढले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर साखळी उपोषण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भोसरी गाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रविवारी (दि. 29) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी बोलताना भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे म्हणाले, “जरांगे पाटील यांच्यासारखे नेतृत्व तयार व्हायला काळ लोटतो. जरांगे पाटील यांनी तब्बेतीला जपावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे.”

Kerala Blast : केरळच्या एर्नाकुलममध्ये स्फोट; 1 ठार तर 20 जण जखमी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भोसरीगाव येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या ठिकाणी विलास लांडे यांनी भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. लांडे म्हणाले, “जरांगे पाटील नावाच्या माणसाने महाराष्ट्र हादरून सोडला.

त्यांच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. सरकार, मंत्रिमंडळ अस्वस्थ आहे. प्रत्येक मराठा तरुण मागील अनेक वर्षांची खदखद रस्त्यावर घेऊन उतरत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत (Bhosari) बनले आहेत.”

जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनासमोर सरकारला गुडघे टेकवावेच लागतील. त्यानंतर आरक्षणही मिळेल. पण जरांगे पाटील यांनी मागील चार दिवसांपासून अन्न पाणी वर्ज्य केल्याने माझ्यासारखा कार्यकर्ता अस्वस्थ आहे.

जरांगे पाटील यांनी तब्बेतीला जपून महाराष्ट्रातील तरुणांना दिशा द्यावी. महाराष्ट्रातील मराठा बांधवांना विश्वासार्ह चेहरा कित्येक वर्षांनी सापडला आहे. अशा नेतृत्वाला आम्हाला गमवायचे (Bhosari)  नाही.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.