Bhosari : सिगारेटचा धूर तोंडावर सोडणाऱ्यांना जाण्यास सांगितल्यावरून दुकानदारास मारहाण

एमपीसी न्यूज – सिगारेटचा धूर महिलेच्या तोंडावर सोडणाऱ्या तरुणांना जाण्यास सांगितले. या कारणावरून दोन जणांनी दुकानदाराला विटांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दापोडी येथे घडली.

सतीश गोरेलाल यादव (वय 35 रा. सीएमई गेटसमोर, दापोडी) असे जखमी दुकानदारांचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 20) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय पवार (वय 22, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) आणि नन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यादव यांच्या दुकानातून सिगारेट पिण्यासाठी माचीस घेतली. त्यानंतर सिगारेटचा धूर फिर्यादी यांच्या भावाच्या पत्नीच्या तोंडावर सोडला.

यामुळे फिर्यादी यादव यांनी आरोपींना दुकानासमोरून जाण्यास सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपी नन्या याने शिवीगाळ केली. तसेच आरोपी विजय पवार याने फिर्यादी यांना जमिनीवर पाडून विटाने मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.