Bhosari : मतदार नोंदणीसाठी भोसरीत विशेष मोहिम

एमपीसी न्यूज – नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदीच्या (Bhosari) तपशीलाची दुरुस्ती अथवा मयत मतदार वगळण्यासाठी 207 भोसरी  विधानसभा मतदार संघात शनिवारी आणि रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार आणि  जिल्हाधिकारी  पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार 207 भोसरी विधानसभा मतदार संघात मतदार यादीच्या पुर्नरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत सर्व साधारण मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

1 जानेवारी 2024  या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Bhosari) कार्यक्रम 27 ऑक्टोबर पासून सुरु झाला आहे. 9 डिसेंबर 2023 पर्यंत हा कार्यक्रम सरु राहणार आहे.

Chikhali : संतपीठ शाळेमध्ये राज्यस्तरीय पुरुष व महिला, आंतरशालेय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

या कालावधी मध्ये नागरीकांकडून दावे व  हरकती म्हणजेच नवीन मतदार नोंदणीचे तसेच मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलाची दुरुस्ती अथवा मयत मतदार वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमात अधिकाधिक नागरीकांनी त्यांची मतदार नोंदणी अथवा दुरूस्ती करुन घेण्यासाठी 4, 5 नोव्हेंबर 2023 तसेच 25 व 26 नोव्हेंबर 2023 या चार दिवशी भोसरी मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर संपर्क करावा.

त्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) सुट्टीच्या दिवशी देखील उपस्थतीत राहून आपले कामकाज करणार आहेत. या विशेष शिबिरात नागरीकांनी आपला सहभाग नोंदवावा तसेच जास्तीत जास्त नवमतदार, महिला, दिव्यांग, भटके विमुक्त , तृतीय पंथी मतदार, या सर्वाची देखील नाव (Bhosari) नोंदणी होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.