Talegaon : पोलीस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून खून, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याचे (Talegaon) सांगून एका 65 वर्षीय नागरिकाचे (Talegaon) अपहरण करून बेल्टने मारहाण करत त्यांचा खून करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.31) तळेगाव दाभाडे, चिचंवड व टाकवे या परिसरात घडला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा खून आर्थिक कारणावरून झाला आहे, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

श्रीकृष्ण उद्धवराव टकले (वय 65) असे मयत नागरिकाचे नाव असून शिवाजी राजाराम गरूड (वय 65 रा. टाकवे) व अनिल शिवलिंग कोळी (वय 45 रा. तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात किरण शंकर खोल्लम (वय 48 रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे.

Bhosari : मतदार नोंदणीसाठी भोसरीत विशेष मोहिम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत टकले हे फिर्यादी यांचे सासरे आहेत. टकले हे फिर्यादीच्या घरी बसले असताना (Talegaon) आरोपी थेट घरात घुसले व त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. टकले यांना बळजबरी गाडीत बसवून चिंचवड येथे आरोपी शिवाजी याच्या मुलीच्या घरी नेले.

तिथे ही पैशांच्या कारणावरून बेल्टने मारहाण करण्यात आली. पुढे त्यांना गाडीत बसवून टाकवे येथे नेले व तेथे ही पुन्हा मारहाण करून त्यांचा खून केला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.