Bhosari Theft Case : दुकानदाराच्या डोक्यात बिअरची बाटली मारून रोख रक्कम पळवली

एमपीसी न्यूज – दुकानदाराच्या डोक्यात बिअरची बाटली मारून (Bhosari Theft Case) दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 29 मे) रात्री दहा वाजता भोसरी येथे घडली.

चंद्रकांत शंकर पवार (वय 39, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत गायकवाड (रा. धावडेवस्ती, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi News : हिंजवडी, निगडी आणि चिखलीमध्ये चोरीच्या चार घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Bhosari Theft Case) यांचे धावडेवस्ती येथे जनरल स्टोअर्स दुकान आहे. ते रविवारी रात्री त्यांच्या दुकानात असताना आरोपी तिथे आला. त्याने काहीही कारण नसताना पवार यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. पवार यांना जखमी करून दुकानाच्या गMpc, mpc news, mpc latest news, mpc, Marathi News, Latest Marathi News, trending news, mpc news local, Local News, Top News, Latest Update, Top Marathi news, crime, crime news, Pimpri-Chinchwad, PimpriChinchwad, मराठी बातम्या, लेटेस्ट मराठी बातम्या, ताज्या बातम्या, एमपीसी न्यूजल्ल्यातून सात हजार रुपये रोख रक्कम संकेत गायकवाड याने जबरदस्तीने चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.