Gandhinagar News : हार्दिक पटेल 2 जूनला भाजपमध्ये जाणार

एमपीसी न्यूज – गुजरात राज्यातील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. गुजरातमधील स्थानिक नेत्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत हार्दिक पटेल यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आता पुढे काय असा प्रश्न सर्वांनाच असताना हार्दिक यांनी मात्र भारतीय जनता पक्षाचा हात धरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांनी येत्या 2 जून रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे समोर आले आहे.

हार्दिक पटेल यांनी 18 मे रोजी त्यांनी काँग्रेसचा हात सोडला होता. त्यानंतर ते आप किंवा भाजपमध्ये सामील होतील, असा अंदाज केला जात होता. मात्र आता ते येत्या 2 जून रोजी भाजपमध्ये जाणार आहेत.

पटेल गेल्या दोन महिन्यांपासून भाजपच्या संपर्कात होते. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

तीन वर्षे वाया गेली

काँग्रेसला रामराम केल्यानंतर हार्दिक पटेल यांनी पक्ष नेतृत्व आणि पक्षाची काम करण्याची पध्दती यावर जोरदार टीका केली होती. मी काँग्रेसमध्ये तीन वर्षे वाया घालवली, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.