Bhosari : पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून साडेसात लाखांची चोरी

Theft of Rs 7.5 lakh from petrol pump office खिडकीचे गज कापून पळविली रक्‍कम

एमपीसी न्यूज – खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील साडेसात लाखांची रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी सकाळी भोसरी येथे उघडकीस आली. भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक करून चोरलेली सर्व रोकड हस्तगत केली आहे.

नारायण अप्पा पवार (वय 26) आणि रमेश प्रभू पवार (वय 22, दोघेही रा. भारतमाता नगर, दिघी. मूळगाव पाटोदा, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील मुलाणी पेट्रोल पंपाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. तेथील कपाटातील साडेसात लाख रुपयांची रोकड चोरून नेली. चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅमेऱ्यावर चादर टाकून खबरदारी घेतली होती.

पोलिसांच्या तपासात पेट्रोल पंपावर काम करणारा नारायण पवार यांच्या हालचाली वेगळ्या वाटल्या. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने आपण आणि मावस भाऊ रमेश यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली.

भोसरी पोलिसांनी अवघ्या दोन तासात गुन्हा उघडकीस आणून साडेसात लाख रुपयांची रोकड चोरट्यांकडून हस्तगत केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1