Bhosari: बेरोजगारीला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhosari: Unemployed youth commits suicide त्याचा विवाह देखील जुळून येत नव्हता. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून नवनाथ याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

एमपीसी न्यूज – तरुणाने राहत्या घरात साडीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 29) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भोसरी येथे उघडकीस आली. मागील काही दिवसांपासून तरुण बेरोजगार होता. त्यामुळे तो नैराश्यात होता. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नवनाथ लांडगे (वय 27, रा. भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी घरात कोणीही नसताना नवनाथ याने घरात गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नवनाथ यांच्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी मिळून आली आहे.

चिठ्ठीमध्ये माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. तसेच, बहिणीची काळजी घ्या. आशा आशयाचा मजकूर आहे. नवनाथ मागील काही दिवसांपासून बेरोजगार होता.

तसेच, त्याचा विवाह देखील जुळून येत नव्हता. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून नवनाथ याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.