Bhosari: डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडत असताना डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सायंकाळी चारच्या सुमारास नाशिक फाट्याजवळील भोसरी वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर घडली.

कमला अर्जुन बानगुडे (वय 45, रा. आंधळे, मुळशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. कमला बानगुडे या नाशिक फाटा येथून जात होत्या. रस्ता ओलांडत असताना भोसरीहून नाशिक फाट्याकडे येत असलेल्या (एमएच 12, एफ झेड 9258) या क्रमांकाच्या डंपरने बानगुडे यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, धडक दिल्यानंतर डंपर रस्ता दुभाजकावर चढून विरूद्ध दिशेच्या रस्त्यावर उलटल्याने त्यातील रेती रस्त्यावर पडून रस्त्यावरच ढीग लागला. त्यामुळे नाशिक फाटा उड्डाणपुलावरून भोसरीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.