Maval : इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

एमपीसी न्यूज – मावळ (Maval)  भागात व धरण क्षेत्रात होणाऱ्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. आज दि. 24 जुलै रोजी भक्ती सोपान पुला वरून पाणी वाहत होते. तसेच सिध्दबेट येथील जुन्या बंधाऱ्या वरून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

Pune : पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या पुढील दोन मार्गांचे होणार उद्घाटन

भक्त पुंडलिक मंदिर पाण्यात असून त्या समोरील दगडी घाट पाण्या खाली आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने  पोलीस प्रशासनाचा नदी घाटावर बंदोबस्त दिसून येत होता. तसेच, अग्निशमन कर्मचारी इंद्रायणी घाटावरती सज्ज होते. याबाबत माहिती अग्निशमन दल कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.