Talegaon Dabhade accident : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.7) रात्री सव्वा नऊच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ गेट जवळ निलया आपार्टमेंट समोर झाला.

याप्रकरणी श्यामलाल बासुदेव गुंजु (वय 25 रा. उर्से) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मयत दुचाकी चालक (एम एच 14 जे टी 8102) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cable theft : गोडाऊनमधून दीड लाखांची केबल चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताची अद्याप ओळख पटलेली नसून  त्याने आपल्या त्याब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले.(Talegaon Dabhade accident) यावेळी त्याची गाडी रस्त्याच्या झुडपात धडकून पडली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.