Pune : भाजपच्या दोन नगरसेविकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार

नगरसेविका कविता वैरागे आणि वर्षा साठे यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : आरक्षित जागेवर निवडूण येणाऱ्या लोकप्रतिनिधींना सहा महिन्यात जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून ते न केल्यास नगरसेवकपद रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका कविता वैरागे आणि वर्षा साठे यांच्या नगरसेवकपदांवर टांगती तलवार उभी राहिली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कोल्हापूर शहरातील तब्बल 20 नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. जात पडताळणी न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा दणका दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील भाजपच्या दोन नगरसेविकांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. प्रभाग क्र. २८ अ अनुसुचित जाती या आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या नगरसेविका कविता वैरागे व प्रभाग क्र. ७३ अ अनुसुचित जाती या जागेवरून निवडून आलेल्या नगरसेविका वर्षा साठे यांचा यामध्ये समावेश आहे.

या दोघी नगरसेविकांनी सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर जातवैधता प्रमाणपत्र सादर केले होते. त्यासंबधीचा प्रस्ताव पालिकेच्या निवडणूक विभागाकडून राज्य निवडणूक आयोगालाही पाठविण्यात आला आहे. आता त्यावर आयोगाकडून अंतिम निर्णय होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.