Pune : फर्ग्युसन कॉलेजमधील सत्यनारायण पूजेला विद्यार्थी संघटनाचा विरोध ; जोरदार निदर्शने

प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी

एमपीसी न्यूज- केवळ एकाच धर्माचे उदात्तीकरण करण्यासाठी सत्यनारायण पूजा केली जात असेल तर त्याचा निषेध करीत फर्ग्युसन महाविद्यालयाने केलेल्या सत्यनारायण पूजेला विद्यार्थी संघटनेने विरोध केला आहे. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने करीत प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी केली. 

दरवर्षी प्रमाणे फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. यंदा देखील महाविद्यालयाच्या मुख्य कार्यालयात सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होते. पूजेचे जाहीर निमंत्रण देण्यात आले होते. मात्र केवळ एकाच धर्माच्या धार्मिक कार्यक्रमाला प्राधान्य का दिले जाते, असा सवाल करीत काही विद्यार्थी संघटनांनी या सत्यनारायण पूजेला जोरदार विरोध केला. प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी करीत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करीत निदर्शने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.