Pimpri: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा व्हिडीओ कॉलद्वारे महापौरांशी संवाद; शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा घेतला आढावा

BJP President JP Nadda takes stock of the coronavirus situation in Pimpri Chinchwad through video conferencing with the PCMC Mayor Mai Dhore

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरूवारी पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा  आढावा घेतला. थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने फोन करून माहिती घेतल्याने आणि काळजी घेण्याचा सल्ला दिल्याने महापौर भारावून गेल्या.

जे. पी. नड्डा यांनी गुरूवारी सायंकाळी व्हिडीओ कॉलद्वारे महापौर उषा ढोरे यांच्याशी संवाद साधला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेमार्फत पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

तसेच भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागरिकांना केल्या जात असलेल्या मदतीची  महापौरांकडून माहिती घेतली.

पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या, संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी केली जाणारी व्यवस्था, महापालिकेकडून कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी केलेल्या स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था, शहरातील नागरिकांमध्ये कोरोनाबाबत केली जाणारी जनजागृती या विषयांवर नड्डा यांनी महापौर ढोरे यांच्याशी चर्चा केली.

त्याचप्रमाणे स्थलांतरीत नागरिकांना त्यांच्या घरवापसीसाठी योग्य व्यवस्था होत आहे का?, सर्व नागरिकांना रेशनिंग दुकानात धान्य योग्य प्रकारे वाटप चालू आहे का, याची माहीतीही नड्डा यांनी घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.