Pune : औद्योगिक क्षेत्रातील रक्तदान महायज्ञात 1007 जणांचे रक्तदान

टिचिंग लर्निंग कम्युनिटीतर्फे औद्योगिक वसाहतींमधील पहिला मोठा रक्तदान महायज्ञ
 
एमपीसी न्यूज – रक्तदानाचे महत्त्व समजावे तसेच याविषयी प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी टिचिंग लर्निंग कम्युनिटीतर्फे औद्योगिक क्षेत्रातील साखळी पद्धतीतील पहिले भव्य रक्तदान शिबिर पुण्यात भरविण्यात आले होते. पुणे शहरातील 11 वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतीमध्ये हे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांतर्गत तब्बल 1007 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 

टिचिंग लर्निंग कम्युनिटी हा एक स्वयंसेवी समूह आहे. संस्थेचे राहुल पाटील, उपक्रम प्रमुख राजेश बारभाई, संजय चाटे, पुणे टिएलसी प्रमुख डि. के. साळुंखे यांनी शिबीराचे संयोजन केले. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढावे, यासाठी त्यांना मार्गदर्शन करून स्वेच्छेने रक्तदाता उभा करणे, उन्हाळ्यात भासणारी रक्ताची चणचण भरून काढने हा या साखळी रक्तदानाचे मुख्य उद्दिष्ट होते. 
 
राहुल पाटील म्हणाले, पुण्यातील 137 कंपन्यांच्या सहभागातून 11 वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचा-यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर राबविण्यात आले. कर्वेनगर, मगरपट्टा, खेड – शिवापूर, बाणेर, पिंपरी- चिंचवड, हडपसर, मार्केटयार्ड, न-हे, सिंहगड रस्ता, श्रीरामपूर अशा ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. 
 
शहरातील सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये प्रथमच साखळी पद्धतीने रक्तदान शिबिर भरविण्यात आले. अधिकाधिक प्रमाणात नवीन रक्तदात्यांची निर्मिती, ग्रामीण भागात रक्तदानाचा प्रसार, नावीन्यपूर्ण पद्धतीने व स्वयंसेवकाच्या सहभागाने रक्तदान जागृती, महिला रक्तदाते वाढण्यासाठी मार्गदर्शन करणे अशा विविध माध्यमाद्वारे कम्युनिटी काम करणार आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.