Bopkhel : शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार गुंडाला अटक

एमपीसी न्यूज – तडीपार केलेल्या आरोपीने शहरात येऊन शस्त्र (Bopkhel) बाळगले. या प्रकरणी त्याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 12) रात्री आठ वाजताच्या सुमारास बोपखेल येथे करण्यात आली.

यश उर्फ बबलू मारुती दिसले (वय 22, रा. बोपखेल, पुणे) असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासह कृष्णा कुमार यादव (रा. बोपखेल, पुणे) याला देखील अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शरद विंचू यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी यश दिसले याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो बेकायदेशीरपणे शहरात आला.

त्याने स्वतःजवळ बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगले. या प्रकरणी त्याला (Bopkhel) शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Pune News – बार्टी व लर्नेट स्किल्स लिमिटेड व दिल्ली यांच्यात सामंजस्य करार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.