Chikhali : तलावाच्या सुशोभीकरणासाठी साडेसहा  कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने चिखली (Chikhali) येथील तलाव पुनरूज्जीवन व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 6 कोटी 64 लाख 48 हजार रुपये इतका खर्च केला जाणार आहे.

Pune News – बार्टी व लर्नेट स्किल्स लिमिटेड व दिल्ली यांच्यात सामंजस्य करार

महापालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियान अंतर्गत हे काम केले जाणार आहे. त्यासाठी पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने 6 कोटी 42 लाख खर्चाची निविदा प्रसिद्ध केली होती.

त्यासाठी डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्टस, बीव्हीजी इंडिया, जेएम इन्व्हा टेक्नोलॉजी, क्युनझी इन्फ्रा, ईगल इन्फ्रा ग्रिनलॅण्ड या ठेकेदारांच्या 6 निविदा प्राप्त झाल्या. त्यातील डब्ल्यूटीई, बीव्हीजी, जेएम या तीन निविदा पात्र ठरल्या.

डब्ल्यूटीईची 6 कोटी 42 लाख 561 रुपये खर्चाची 3.5 टक्के अधिक दराची निविदा स्वीकृत ठरली आहे. रॉयल्टी चार्जेस व मटेरियल टेस्टींग धरून हा खर्च 6 कोटी 64 लाख 48 हजार इतका आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. तलावाचे पुनरूज्जीवन व सुशोभिकरणाचे काम 6 महिन्यात केले जाणार आहे.

 

तसेच, संभाजीनगरमधील बर्ड व्हॅली, भोसरी व प्राधिकरण, निगडीतील गणेश तलाव या तीन तलावांचेही पुनरूज्जीवन व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 17 कोटी 22 लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. ते काम डब्ल्यूटीई इन्फ्रालाच देण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.