Shirgaon : एसी, टीव्ही, वॉशिंग मशीन कंपनीस न पुरवता दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीला एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीन देण्यासाठी कंपनीकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर कंपनीस त्या वस्तू न पुरवता फसवणूक केली. याप्रकरणी पुरवठा दारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 एप्रिल ते 21 एप्रिल या कालावधीत शिरगाव (Shirgaon) येथे घडला.

Chikhali : तलावाच्या सुशोभीकरणासाठी साडेसहा  कोटींचा खर्च

धनंजय गुलाब भांगरे (वय 30, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित शर्मा (रा. फरीदाबाद, हरियाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीला 13 एसी, एक टीव्ही आणि एक वॉशिंग मशीन देण्याचे काम घेतले. त्या वस्तू पुरविण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीकडून दोन लाख रुपये घेतले. पैसे घेऊन देखील कंपनीस वरील वस्तू न देता कंपनीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.