Budget News : गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता या सरकारसाठी लक्ष केंद्रित करण्याजोग्या चार प्रमुख जाती – केंद्रीय अर्थमंत्री

एमपीसी न्यूज – पंतप्रधानांच्या (Budget News) नेतृत्वाखालील सरकार ‘गरीब’ (गरीब), ‘महिला’ (स्त्रिया), ‘युवा’ (तरुण) आणि ‘अन्नदाता’ (शेतकरी) या चार प्रमुख जातींवर लक्ष केंद्रित करण्यावर ठाम विश्वास ठेवते असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान केले.

“त्यांच्या गरजा, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांच्या प्रगतीवरच देशाची प्रगती अवलंबून आहे. या चारही वर्गांना त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता असते आणि ती त्यांना पुरवण्यात येते. त्यांचे सक्षमीकरण आणि कल्याण देशाला प्रगतीपथावर नेईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Vatsalya : गर्भधारणेपूर्वीपासून माता व बालकाचे संगोपन करण्यासाठी ‘वात्सल्य’ कार्यक्रम

सामाजिक न्याय हा एक प्रभावी आणि आवश्यक प्रशासन (Budget News ) आदर्श प्रारूप आहे असे मत निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचार कमी करण्यावर भर दिल्याने पारदर्शकता आली असून सर्व पात्र लोकांना त्याचा लाभ प्राप्त झाला आहे आणि ‘थेट लाभ हस्तांतरण’ प्रणालीद्वारे हे साध्य झाले आहे यावर त्यांनी जोर दिला. सरकारचे लक्ष फलनिष्पत्तीवर आहे, खर्चावर नाही, असेही त्या म्हणाल्या.

सन 2047 पर्यंत भारताला ‘विकसित भारत’ बनवण्याच्या अनुषंगाने विकासाबाबत सरकारचा सर्वांगीण, सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आपण लोकांच्या क्षमतेत आणि सक्षमीकरणात सुधारणा करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी उद्धृत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.