Cabinet Decision : नवीन वर्षाच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत दहा निर्णय; निवृत्तीवेतन योजना, दूध अनुदान यासह विविध महत्वाचे निर्णय

एमपीसी न्यूज – नवीन वर्षाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज (गुरुवारी, दि. 4) मंत्रालयात पार ( Cabinet Decision)  पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय –

  • नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
  • अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये मोजावे लागणार
  • दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शासन देणार दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान.
  • विदर्भातील  सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल केली जाणार आहे.
  • मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता दिला जाणार आहे.
  • पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 400 उद्योगांना फायदा होणार आहे.
  • रेशीम उद्योगाच्या विकासासाठी ‘सिल्क समग्र 2’ योजना राबवली जाणार आहे. याचा रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
  • द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबवली जाणार आहे.
  • नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. यासाठी 750 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
  • सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढविण्याबाबत या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात ( Cabinet Decision) आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.