Kanyadan Yojana : कन्यादान योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : कन्यादान योजनेअंतर्गत (Kanyadan Yojana) सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांना 20 हजार रुपये तर विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 4 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.

Bhosari crime : उपनिबंधक कार्यालयातील शिपायाने बनावट कागदपत्राद्वारे केली ग्रामसेवकाची नेमणूक

कन्यादान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी सामुहिक सोहळा (Kanyadan Yojana) आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, यंत्रणांनी सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, स.क्र. 104/105, विश्रांतवाडी रोड, पोलीस स्थानकासमोर, येरवडा, पुणे – 06 ( दू.क्र. 020-29706611) येथे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.