Dighi Crime : मुलाकडून आई-वडिल व भावडांना मारहाण

एमपीसी न्यूज – घरगुती भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आई-वडिल व भावंडाना मुलाने साथीदारांसोबत मिळून सावत्र भावांसह, आई-वडिलांना बेदम मारहाण (Dighi Crime) केली. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी समर्थ नगर, दिघी येथे घडली.

प्रमोद शिवाजी कोळेकर (वय 32, रा. समर्थ नगर, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद कोळेकर (वय32), सुरज पाटोळे (वय 30, रा. मुंबई) आणि सुरजचे चार मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cow stolen : गुंगीचे इंजेक्शन देऊन गायीला चोरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद, त्यांची सावत्र आई, सावत्र भाऊ यांचे आरोपी प्रसाद याच्यासोबत भांडण झाले होते. हे भांडण मिटविण्यासाठी परिसरात रहाणारे मनोज गायकवाड यांना फिर्यादींनी बोलावून आणले. वाद मिटवत असताना आरोपी प्रसाद याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून सावत्र भाऊ फिर्यादी प्रमोद, भाऊ विजय यांना मारहाण केली. मनोज गायकवाड यांनाही मारहाण केली. भांडण (Dighi Crime) सोडविण्यासाठी आलेल्या आईच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यात आईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले आणि गहाळ झाले. फिर्यादीचे वडील मध्ये आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.