Lumpy disease and vaccine : लम्पी आजार आणि लसीकरणाबाबत बाबुराव वायकर यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यात जनावरांना लम्पी आजाराचा संसर्ग झाला आहे. काही जनावरे दगावल्याच्या घटना उघडकीस आल्या असून जनावरांची काळजी घेण्याचे तसेच लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर यांनी केले आहे.(Lumpy disease and vaccine) तसेच वायकर यांनी याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून आढावा घेत लम्पी आजाराचा संसर्ग झालेल्या ठिकाणापासून पाच किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यासंदर्भात वायकर यांनी पशुसंवर्धन आयुक्त डाॅ मुकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शिवाजी विधाटे यांच्याकडून आढावा घेतला असता, जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 3 जनावरांचा मृत्यू झालेला असून,बाकी ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आहे.(Lumpy disease and vaccine) जिल्ह्यात 2 लाख 25 हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत  त्यापैकी 1 लाख लसीकरण पूर्ण झाले असून जिल्ह्यात वेल्हा तालुका सोडून इतर तालुक्यात लम्पी आजाराचा संसर्ग आहे. अशी माहिती देण्यात आली.

Bhosari crime : उपनिबंधक कार्यालयातील शिपायाने बनावट कागदपत्राद्वारे केली ग्रामसेवकाची नेमणूक

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लसीकरण होईपर्यंत जनावरांची काळजी काळजी घ्यावी,ज्यांना संसर्ग झाला अशी जनावरे व ज्यांना होऊ शकतो, अशा जनावरांचे लसीकरण करावे,(Lumpy disease and vaccine) तसेच संसर्ग होईल अशी लक्षणे दिसतील, त्यापूर्वीच वेळीच खबरदारी म्हणून लसीकरण केले तर होणारा संसर्ग टाळता येईल. त्यादृष्टीने सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वायकर यांनी केले. जिल्ह्यात जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे परिसरातील जनावरांचे लसीकरण करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.