Car – Container Crash News : कार – कंटेनरचा भीषण अपघात, कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कार – कंटेनरचा भीषण अपघात (Car – Container Crash) झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना नाहक जीव गमवावा लागला. शनिवारी (दि.04 मे) दुपारी 4 च्या सुमारास हा अपघात घडला.

DCM Ajit Pawar : तालुक्यातील सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढा – अजित पवार

पिंपरी – चिंचवडहून शिरोटे कुटुंब जयसिंगरपूर कडे निघाले होते. दरम्यान वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील येवलेवाडी फाटा येथे शिरोटे कुटुंबियांची कार रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला (Car – Container Crash) पाठीमागून जोरात धडकली. दरम्यान या धडकेत कुटुंबातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.