River Plogathon News : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात ‘रिव्हर प्लॉगेथॉन’ मोहिमेचे आयोजन

एमपीसी न्यूज – चिखली गावठाण इंद्रायणी नदी पात्र परीसरात महापालिका, विकास अनाथ आश्रम व जनवाणी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “रिव्हर प्लॉगेथॉन मोहिम” (River Plogathon) राबविण्यात आली. स्वच्छाग्रह मोहिमेअंतर्गत आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने शहरात दि. 25 मे ते 05 जून 2022 या कालावधीत “प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड शहर” ही मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेतर्गत रिव्हर प्लॉगेथॉन (River Plogathon) संकल्पनेतून इंद्रायणी नदी घाट येथील प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्यात आला. महापालिका आपल्या नवनवीन उपक्रमांमधून नेहमीच स्वच्छतेबाबत पुढाकार घेत असल्याचे वारंवार पाहायला मिळते.

Car – Container Crash News : कार – कंटेनरचा भीषण अपघात, कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

स्वच्छाग्रह मोहिम ही एक सामाजिक चळवळ व्हावी, या हेतूने समाजातील सर्व घटकांना यामध्ये जोडण्याचे काम करत असते. स्वच्छतेचे कार्य हे दिखाऊ नसावे, त्यासाठी मनाची तयारी असणे फार गरजेची असते. महानगरपालिकेला सतत मिळत असलेल्या नागरीकांचा प्रतिसाद बघता एक स्वच्छतेची चळवळ उभी राहत आहे, असे मत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय साहाय्यक आरोग्य अधिकारी, श्री.सुधिर वाघमारे सर यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम लक्षात घेऊन नागरिकांनी जास्तीत-जास्त कापडी पिशवीचाच वापर करावा या संबंधी गीत सादर करत जनवाणी संस्थेच्या पर्यवेक्षकांनी स्वच्छतेचा संदेश दिला.

रिव्हर प्लॉगेथॉन मोहिमेत (River Plogathon) इंद्रायणी नदी पात्र तसेच आजूबाजूचा परीसर स्वच्छ करत सुमारे 640 किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. यावेळी, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय साहाय्यक आरोग्य अधिकारी सुधिर वाघमारे, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, आरोग्य निरीक्षक महेंद्र साबळे, आरोग्य निरीक्षक अमित पिसे, विकास अनाथलयाचे संस्थापक अध्यक्ष विकास साने, जनवाणी संस्था प्रकल्प प्रमुख मंगेश क्षिरसागर, जनवाणी संस्था सर्व समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते अमृत आप्पा सोणवने, दिनेश यादव, जितुभाऊ यादव, विजय काटे, दिनेश कदम, ऋषिकेश सांडभोर, सखाराम धोत्रे. कॉनक्वेस्ट कॉलेज मुख्यध्यापक प्रदीप कदम आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.