DCM Ajit Pawar : तालुक्यातील सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढा – अजित पवार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यात अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना ऊर्जा दिली. मावळ तालुक्यातील सर्व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, कॅन्टोमेंटसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढवून विजयी व्हा. शासनाच्या अनेक योजनांमधून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आदिवासी आश्रम शाळेला 11 कोटी रुपयांचा निधी जाहीर करत भंडारा डोंगर दशमी समितीला यावेळी निधी देण्यात आला तसेच काही विशेष सत्कार देखील करण्यात आले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा नूतन वास्तूचा भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी (दि. 3) पार पडला. यावेळी तालुक्यातील 187 कोटी 72 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)  बोलत होते.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजीमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे,आमदार सुनील शेळके,आमदार रोहित पवार, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, तालुका महिला अध्यक्षा दिपाली गराडे, जिल्हा महिला अध्यक्षा भारती शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर,सहकार महर्षी माऊली दाभाडे,माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,शहर अध्यक्ष गणेश काकडे, सरसेनापती दाभाडे घराण्यातील अंजलीराजे दाभाडे, सत्येन्द्रराजे दाभाडे, सत्यशिलराजे दाभाडे, वृशालीराजे दाभाडे, याज्ञीसेनीराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे,सचिन घोटकुले, विठ्ठल शिंदे, दीपक हुलावळे,रामनाथ वारिंगे,किशोर भेगडे, संजय बाविस्कर, संतोष भेगडे,अरुण माने,वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, स्मिता चव्हाण, प्रशांत भागवत, राजेंद्र खांडभोर, राजू दौंडकर, चंद्रकांत दाभाडे, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य, सभापती तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Todays Horoscope 05 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यात झालेल्या विकासकामाचा आढावा घेत त्यासाठी चांगला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अजित पवार यांचे आभार व्यक्त केले तसेच पवना प्रकल्प ग्रस्त प्रकरण लवकर सोडविणे, आंद्रा धरणातून तळेगावसाठी पाणी योजना, क्रीडा संकुल आदी मागण्या यावेळी केल्या. सभेचे अध्यक्ष झिरवाळ यांनी आदिवासी बांधवांना केलेल्या मदती बद्दल समाधान व्यक्त केले, आमदार रोहित पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्या कामाचे कौतुक केले.

स्वागत गणेश काकडे यांनी केले. प्रास्ताविक गणेश खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश खांडभोर यांनी केले. आभार संतोष भेगडे यांनी केले.

दरम्यान,  कार्यक्रमात आदिवासी आश्रमशाळेस 11 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. चंद्रकांत निवृत्ती दाभाडे यांच्याकडून भंडारा डोंगर दशमी समितीस 11 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट कार्याबद्दल संपर्क बालग्रामाचे अमित बॅनर्जी यांचा सन्मान झाला. सरसेनापती दाभाडे घराण्यातील सदस्यासह तालुक्यातील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश झाला. यावेळी बोलताना पर्यटनाला चालना मिळण्यासाठी शासन निधी देणार असल्याचेही सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.