Todays Horoscope 05 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – रविवार, दि. 05.06.2022 (Todays Horoscope 05 June 2022)

  • शुभाशुभ विचार – सामान्य दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अश्लेषा नक्षत्र.
  • चंद्र राशी – कर्क 24.25 पर्यंत.

—————————————–

आजचे राशी भविष्य – (Todays Horoscope 05 June 2022)

मेष – (शुभ रंग- मरून)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी असेल. परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढतच राहणार आहेत, तरीही गृहिणी आज काटकसर करून बचतीस प्राधान्य देतील.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अति स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. तुमची काही गुपिते उघड होतील. कमी बोलणे हिताचे राहील.

मिथुन – ( शुभ रंग- आकाशी)

आज पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचा ही प्रभाव राहील. भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

DCM Ajit Pawar : तालुक्यातील सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढा – अजित पवार

कर्क – (शुभ रंग- निळा)

अथक परिश्रमांच्या सहाय्यानेच आज प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने काही योग्य माणसे संपर्कात येतील. काही मनाजोगत्या घटना उत्साह वाढवतील.

सिंह – (शुभ रंग – चंदेरी)

आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. आज अति आत्मविश्‍वास मात्र घातक ठरेल. इतरांस मदत करताना आपली ही शिल्लक तपासा.

कन्या – ( शुभ रंग – पांढरा)

प्रतिष्ठितांच्या ओळखीतून काही तरी फायदा होईल. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असलेला दिवस सत्कारणी लावा.

तूळ – (शुभ रंग- सोनेरी)

व्यवसायातील प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कामाचे तासही वाढवावे लागतील. रिकामे वाद-विवाद टाळा.

वृश्चिक – (शुभरंग – स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. कुणाला मागीतल्याशिवाय सल्ले देऊ नका, कारण त्याने नाती दुरावतील.

धनु – (शुभ रंग – भगवा)

आज कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. वैवाहिक जीवनात जोडीदारास फार प्रश्न न विचारणे हिताचे राहील. नीती बाह्य वर्तन टाळायला हवे. गाडी हळू चालवा.

मकर – (शुभ रंग -जांभळा)

व्यवसायात भागीदारांशी सलोखा राहील. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे फुगवे असतीलच. कुटुंबात सुसंवाद राहील.

कुंभ – ( शुभ रंग -गुलाबी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागणार आहे. उच्चशिक्षितांना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.

मीन – (शुभ रंग- मोतीया)
तुमच्या कामातील उत्साह आज इतरांना प्रेरणा देईल. हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. एखाद्या मॉल मध्ये फेरफटका माराल. बिनधास्त खर्च कराल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन – 9689165424
(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.